बुलडाणा: जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे 14 डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की,जिल्ह्यात कोरोनाव्हायरस या संसर्गजन्य रोगाने पहिलेच थैमान घातलेले असताना देखील जिल्ह्यात दिवसा ढवल्या पोलिस प्रशासनाच्या नजरेसमोर प्रशासनाच्या आशीर्वादाने वरली मटका, अवैध दारूविक्री, तितली पुठ्ठा, एक्का बादशाह, अवैध प्रवासी वाहतूक अशा विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यामुळे याच धंद्याच्या आधारे जिल्हाभर अवैध सावकारी देखील याच अवैध धंदे करणाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहेत. या अवैध धंद्यामुळे गोरगरिबांच्या संसार उघड्यावर आले आहेत. तसेच जिल्ह्यात वाढलेल्या या अवैध धंद्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असल्याचे दिसून येत आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. तसेच आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. या सर्व गोष्टीकडे वरिष्ठांनी लक्ष घालून या अवैध धंद्यांना आळा घालावा , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शे. अतिक, अनिल मुठ्ठे, संदीप काकडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी