महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीने आज निवेदन देणार
परळी I प्रतिनिधी बाबा शेख
सोलापूर येथील दुधवाला दुध प्रकल्पाचे मालक अजिंक्य भारत कदम यांनी सोलापूर शहर व ग्रामीण भागात सोशल मिडिया व वर्तमानपत्रा मध्ये जाहिरात पत्रकाच्या माध्यमातून स्वार्थापोटी गवळी समाजाची बदनामी केली असून त्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गवळी समाज संघटना परळी वैजनाथ यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
पारंपारिक पद्धतीने दुधव्यवसाय करणाऱ्या गवळी समाज व दुधव्यावसायकांची बदनामी जाहिरात पत्रकाच्या माध्यमातून केली असुन राज्यातील असंख्य गवळी समाज बांधव व पारंपारिक पद्धतीने दुधव्यवसाय करणाऱ्या दुधव्यावसायकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यामध्ये संतापाची लाट आल्याचे दिसून येत आहे. याबाबत, सोलापूर येथील दुधवाला दुध प्रकल्पचे मालक अजिंक्य भारत कदम रा.कोंडी ता.उत्तर सोलापूर यांचे वर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती परळी गवळी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
सोलापूरच्या दुधवाला प्रकरणाने गवळी समाजात संतापाची लाट