बुलडाणा.देऊळघाट येथील मुमताज़ सर यांचे दुखद निधन*

 देऊळघाट येथील मुमताज़ सर यांचे दुखद निधन


संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात सुपरिचित मुमताज़ सर यांचे आज 25 डिसेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान औरंगाबाद येथे

 दुःखद निधन झाले आहे. नेहमी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिलेले मुमताजुर्रहीम खान महेताबुर्रहीम खान रा.देऊळघाट,ता+जि. बुलडाणा हे सिल्लोड येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. मागील काही वर्ष अगोदर त्यांनी वेलेंट्री रिटायरमेंट घेऊन स्वताला सामाजिक व राजकीय क्षेत्रात झोकुन दिले होते.देऊळघाट येथे त्यांनी एम.एम.शेख उर्दू प्रायमरी सकुल सुरु केली होती त्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते.काँग्रेस पक्षात अनेक महत्वाचे पदावर राहिले व नंतर वंचित बहुजन आघाडी मध्ये दाखल होऊन जिल्हा सचिव पद भूषविले. 5-6 दिवस अगोदर शुगर वाढल्याने त्यांना बुलडाणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अशातच पेरेलिसिसचा अटेक आला म्हणून तात्काळ औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात 2 दिवस अगोदर दाखल करण्यात आले होते व आज 25 डिसेंबर रोजी सकाळी त्यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,3 मुले व भाऊ-बहीण असा आप्त परिवार आहे.