परळीत प्रेस पोलिस नावाच्या गाड्यांचा सुळसुळात ! परळी शहरात नावाचा बहुरूपी वापर स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज -बाबा शेख

परळी
प्रत्येक क्षेत्राची ओळख ही त्यांच्या कार्यातून व  त्यांच्या सिम्बॉल वरून ओळख पटत असते. ज्या क्षेत्रात जो व्यक्ती कार्यरत आहे त्याचा सिम्बॉल म्हणून गाड्यावर स्टिकर स्वरूपात सिम्बॉल लावण्याचा ट्रेंड आहे.
परळीत सध्या अनोळखी व्यक्तीच्या गाड्यावर प्रेस व पोलिस नावाचा सिम्बॉल पहावयास मिळत आहे. प्रेस पत्रकार  व पोलिस आपली कामे कर्तव्य दक्ष कार्य करत असून त्यांच्या नावाने बहुरूपी तोतया काही महाशय यांनी गोरख धंदा चलावन्या साठी या नावाचा गैर वापर करत असून आपल्या दोन व चार चाकी वाहनावर असे नाव टाकून दिशाभूल करुण आपली कामे करत आहेत तरी अश्या तोतया बहुरूपी महाशयवर स्थानिक प्रशासनाने या अश्या गाड्यांची चौकशी करून  तश्या दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी.
पत्रकार म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या काही व्यक्ती मुळे समाजात काही अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता असून अश्या बहिरूपीया व्यक्यिवर तात्काळ पोलीस प्रशासनाने अंकुश घालणे गरजेचे व त्यांच्याकडे असलेले त्यांचे कार्ड शहानिशा करावे  *परळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बाबा शेख* यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.