ऑनलाइन बिंगो मटका आता चक्क मोबाईलवर

शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीही खेळताहेत मटका; गोरगरिबांचे संसारही उध्वस्त; पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष


*परळी वैजनाथ (प्रतिनिधी दैनिक जंग बाबा शेख)*

परळी शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अवैद्य धंदे यांनी जोर धरला असून शहरात विविध भागात ऑनलाइन मटका सुरू आहे. पोलिसांनी तोंड बघून काही दिवसांपूर्वी या लोकांवर कारवाई केली होती मात्र बिंगो चालकांनी  आता हा ऑनलाईन मटका अँड्रॉइड मोबाईल वर खेळता येऊ शकेल अशी नवीन शक्कल लढवली आहे या ऑनलाईन बिंगो मटक्याला शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक बळी पडत असल्याचे दिसून येत असून याकडे परळी पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिकांतून केली जात आहे.

पोलिसांनी कारवाई करूनही बिंगो मटका चालकांनी नवीन शक्कल लढवत बिंगो मटका सुरू ठेवला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली असून पोलिसांनी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोबाईल तपासावेत म्हणजे सत्य बाहेर येईल. कारण या ऑनलाइन बिंगो मटक्याच्या आयडी बिंगो चालकाकडून विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाल्याने हा खेळ आता जोर धरू लागला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहरात विविध ठिकाणी ऑनलाइन बिंगो मटका जोरात सुरू होता. या या ऑनलाईन बिंगो मटका मुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामुळे काही लोक व्यसनाधीनही झाले असून घराघरात पती-पत्नीमध्ये दररोज भांडणे होत आहेत याबाबत काही वृत्तपत्रांनी वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी ऑनलाईन बिंगो मटका चालकावर कारवाई केली होती. मात्र ही कारवाई सर्व बिंगो मटका चालकावर न करता काही मोजक्याच दोन-तीन जनावर केल्याचे दिसून आले यामुळे यात पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध तर नाही ना ? अशीही चर्चा परळी शहरातील सर्वसामान्य नागरिक करीत आहे.